| इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार | ||||||||
| चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १ | ||||||||
| भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार | ||||||||
| लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २ | ||||||||
| इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव | ||||||||
| गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक.......................३ | ||||||||
| कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला | ||||||||
| जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४ | ||||||||
| इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो | ||||||||
| टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५ | ||||||||
| इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते | ||||||||
| भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६ | ||||||||
| इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे | ||||||||
| नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7 | ||||||||
Wednesday, March 24, 2010
संदिप खरे......नाजुक .............
संदिप खरे........देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??
| देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे... | ||||||
| मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे... | ||||||
| उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग... | ||||||
| पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग... | ||||||
| देते कोण..देते कोण.. देते कोण देते ?? | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| सुर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा... | ||||||
| घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा.... (देते कोण... देते कोण....) | ||||||
| मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख... | ||||||
| चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक... | ||||||
| देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा... | ||||||
| खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा...(देते कोण... देते कोण.... ) | ||||||
| कोळंब्याला चीक आणि अळूला ह्या खाज... | ||||||
| कोणी नाही बघे तरी लाजाळुला लाज... | ||||||
| देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| मुठभर जीव..आणि हातभर तान... | ||||||
| कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान... (देते कोण... देते कोण.... ) | ||||||
| काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा... | ||||||
| पावसाच्या अगोदर ओली होते हवा... | ||||||
| देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| भिजे माती आणि उरे अत्तर हवेत... | ||||||
| छोट्या छोट्या बियांतून लपे सारी शेतं... | ||||||
| नाजुकश्या गुलाबाच्या भोवतीने काटे... | ||||||
| सरळश्या खोडावर फुटे दहा फाटे.. | ||||||
| देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी... | ||||||
| पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी... | ||||||
| भुईतून येतो तरी नितळ हा झरा... | ||||||
| चिखलात उगवतो तांदुळ पांढरा... | ||||||
| देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
| रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
| रुम...ता रा रा.... रुम | ||||||
| रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
| .....Sandip Khare | ||||||
Friday, March 12, 2010
मन वढाय वढाय ....... बहिबाई
| मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा वा-यानं चालल्या पान्यावऱ्हल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन ? उंडारलं उंडारलं जसं वारा वहादनं मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात ? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर अरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर ! मन चपय चपय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर मन एवढं एवढं जसा खाकसंचा दाना मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना देवा, कसं देलं मन आसं नही दुनियांत ! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ! देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ? कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ! |
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबलेला कुणाशी बोलले ना
चालले लुटुतुटु पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांजवेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय
जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती
हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण
तव नयनांचे दल हलले ग ! -बा. भ. बोरकर
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हे डळमळले ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !
ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !