देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे... | ||||||
मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे... | ||||||
उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग... | ||||||
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग... | ||||||
देते कोण..देते कोण.. देते कोण देते ?? | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
सुर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा... | ||||||
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा.... (देते कोण... देते कोण....) | ||||||
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख... | ||||||
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक... | ||||||
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा... | ||||||
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा...(देते कोण... देते कोण.... ) | ||||||
कोळंब्याला चीक आणि अळूला ह्या खाज... | ||||||
कोणी नाही बघे तरी लाजाळुला लाज... | ||||||
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
मुठभर जीव..आणि हातभर तान... | ||||||
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान... (देते कोण... देते कोण.... ) | ||||||
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा... | ||||||
पावसाच्या अगोदर ओली होते हवा... | ||||||
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
भिजे माती आणि उरे अत्तर हवेत... | ||||||
छोट्या छोट्या बियांतून लपे सारी शेतं... | ||||||
नाजुकश्या गुलाबाच्या भोवतीने काटे... | ||||||
सरळश्या खोडावर फुटे दहा फाटे.. | ||||||
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी... | ||||||
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी... | ||||||
भुईतून येतो तरी नितळ हा झरा... | ||||||
चिखलात उगवतो तांदुळ पांढरा... | ||||||
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥ | ||||||
रुम... रुम ता रा रा... रुम | ||||||
रुम...ता रा रा.... रुम | ||||||
रुम ता रा रा... रुम तारा... | ||||||
.....Sandip Khare |
Wednesday, March 24, 2010
संदिप खरे........देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment