कवितांचे विश्व......................
Wednesday, May 13, 2009
गारवा.....पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे
घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे
तुझी आसवे पाझरु लागता
खर्या पावसाने कुठे जायचे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment