काय रे देवा... | |||||||
आता पुन्हा पाऊस येणार | |||||||
आकाश काळ निळ होणार | |||||||
मग मातीला गंध सुटणार | |||||||
मग मध्येच वीज पडणार | |||||||
मग तुझी आठवण येणार | |||||||
काय रे देवा... | |||||||
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार | |||||||
मग मी ती लपविणार | |||||||
मग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार | |||||||
मग ते कुणीतरी ओळखणार | |||||||
मग मित्र असतील तर रडणार | |||||||
नातेवाईक असतील तर चिडणार | |||||||
मग नसतच कळल तर बर अस वाटणार | |||||||
आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार.. | |||||||
मग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार | |||||||
मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार | |||||||
मग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार | |||||||
मग ते साहीर नी गायलेल असणार | |||||||
मग ते लतानी गायलेल असणार | |||||||
मग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार | |||||||
मग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार | |||||||
मग ना घेण ना देण | |||||||
पण फूकाचे कंदील लागणार | |||||||
काय रे देवा... | |||||||
मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार | |||||||
मग त्याला आकाशाची आसव लगडणार | |||||||
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार | |||||||
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार | |||||||
मग ऊर फुटून जावस वाटणार | |||||||
छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार | |||||||
मग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार | |||||||
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार | |||||||
बंद नाही पडणार | |||||||
काय रे देवा... | |||||||
पाऊस पडणार | |||||||
मग हवा हिरवी होणार | |||||||
मग पानापानात हिरवळ दाटणार | |||||||
मग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार | |||||||
पण त्याला ते नाही जमणार | |||||||
मग त्याला एकदम खर काय ते कळणार | |||||||
मग ते ओशाळणार | |||||||
मग पुन्हा शरीराशी परत येणार | |||||||
सरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार | |||||||
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार | |||||||
एस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार | |||||||
रेडिओचा स्टॉक भरलेला असणार | |||||||
मग तिच्या जागी ती असणार | |||||||
मग माझ्या जागी मी असणार | |||||||
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार | |||||||
पाऊस गेल्या वर्षी पडला | |||||||
पाऊस यंदाही पडतो | |||||||
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार | |||||||
काय रे देवा... | |||||||
...संदीप खरे | |||||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे.......काय रे देवा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment