| काय रे देवा... | ||||||
| आता पुन्हा पाऊस येणार | ||||||
| आकाश काळ निळ होणार | ||||||
| मग मातीला गंध सुटणार | ||||||
| मग मध्येच वीज पडणार | ||||||
| मग तुझी आठवण येणार | ||||||
| काय रे देवा... | ||||||
| मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार | ||||||
| मग मी ती लपविणार | ||||||
| मग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार | ||||||
| मग ते कुणीतरी ओळखणार | ||||||
| मग मित्र असतील तर रडणार | ||||||
| नातेवाईक असतील तर चिडणार | ||||||
| मग नसतच कळल तर बर अस वाटणार | ||||||
| आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार.. | ||||||
| मग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार | ||||||
| मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार | ||||||
| मग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार | ||||||
| मग ते साहीर नी गायलेल असणार | ||||||
| मग ते लतानी गायलेल असणार | ||||||
| मग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार | ||||||
| मग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार | ||||||
| मग ना घेण ना देण | ||||||
| पण फूकाचे कंदील लागणार | ||||||
| काय रे देवा... | ||||||
| मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार | ||||||
| मग त्याला आकाशाची आसव लगडणार | ||||||
| मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार | ||||||
| मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार | ||||||
| मग ऊर फुटून जावस वाटणार | ||||||
| छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार | ||||||
| मग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार | ||||||
| पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार | ||||||
| बंद नाही पडणार | ||||||
| काय रे देवा... | ||||||
| पाऊस पडणार | ||||||
| मग हवा हिरवी होणार | ||||||
| मग पानापानात हिरवळ दाटणार | ||||||
| मग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार | ||||||
| पण त्याला ते नाही जमणार | ||||||
| मग त्याला एकदम खर काय ते कळणार | ||||||
| मग ते ओशाळणार | ||||||
| मग पुन्हा शरीराशी परत येणार | ||||||
| सरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार | ||||||
| चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार | ||||||
| एस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार | ||||||
| रेडिओचा स्टॉक भरलेला असणार | ||||||
| मग तिच्या जागी ती असणार | ||||||
| मग माझ्या जागी मी असणार | ||||||
| कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार | ||||||
| पाऊस गेल्या वर्षी पडला | ||||||
| पाऊस यंदाही पडतो | ||||||
| पाऊस पुढल्या वर्षीही पडणार | ||||||
| काय रे देवा... | ||||||
| ...संदीप खरे | ||||||
Wednesday, March 24, 2010
संदिप खरे......काय रे देवा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment