क्षितिजाच्या पार | ||||||
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे | ||||||
वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते | ||||||
कुणी जा दूर तशी मनी हूरहूर | ||||||
रात ओलावत सूर वात मालवते... | ||||||
आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण | ||||||
कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण | ||||||
पायरीला ठसे दार खुले छत पिसे | ||||||
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते... | ||||||
आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी | ||||||
आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी | ||||||
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे | ||||||
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते... | ||||||
मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके | ||||||
त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके | ||||||
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ | ||||||
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते... | ||||||
सांज अबोला अबोला सांज कल्लॊळ कल्लॊळ | ||||||
सांज जोगीण विरागी सांज साजीरी वेल्हाळ | ||||||
सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत | ||||||
दूर लागले गावात दीप फरफरतेक्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे | ||||||

दूर लागले गावात दीप फरफरते | ||||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे............क्षितिजाच्या पार........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment