या कवितेचा विशेष म्हणजे ........ तीन कडवी तीन वेगवेगळ्या रसांमधली आहेत (वीर रस, करूण रस व भक्ती रस) | ||||||||||
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन | ||||||||||
वरतून चड्डी आतून पँट | ||||||||||
अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार | ||||||||||
पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो | ||||||||||
उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक | ||||||||||
रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच | ||||||||||
गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर | ||||||||||
कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी | ||||||||||
अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी | ||||||||||
अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन | ||||||||||
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन | ||||||||||
जरी जगाहून भिन्न असे, तरी मनातून खिन्न असे | ||||||||||
आदर करती सर्व जरी परी न कोणी मित्र तरी | ||||||||||
लांबून कौतुक हे नुसते, कुणी न मजला हे पुसते | ||||||||||
जेवण झाले काय तुझे, काय गड्या हे हाल तुझे | ||||||||||
दिवस रात्र हे तू दमशी, सांग तरी मग कधी निजशी | ||||||||||
उडता उडता असे सुसाट, दुखते का रे मधेच पाठ | ||||||||||
एकएकटे फिरताना, विचार करतो उडताना | ||||||||||
आत रिकामे का वाटे, कसे वाटते सर्व थिटे | ||||||||||
अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत | ||||||||||
करुन बसला तोंड लहाऽऽऽऽन | ||||||||||
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन | ||||||||||
असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी | ||||||||||
बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान | ||||||||||
काय तयाचे रूप दिसे सुर्याचे प्रतिबिंब जसे | ||||||||||
शक्ती ही अन् युक्ती ही, तरी अंतरी भक्ती ही | ||||||||||
आणि बोलले मग हनुमान.... | ||||||||||
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन | ||||||||||
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन | ||||||||||
रोनी सी ये सूरत क्यूँ? मित्रा I am proud of you!! | ||||||||||
सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू | ||||||||||
ऐक एवढे ते अवधान, शक्ती युक्ती चे हे वरदान | ||||||||||
त्या रामाने दिले तुला, त्याने बनवले तुला मला | ||||||||||
त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम | ||||||||||
साथ जरी ना कुणी असे, आत तुझ्या पण राम असे | ||||||||||
राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा | ||||||||||
त्या रामाचे करूनी ध्यान, चिरंजीव भव सुपरमँऽऽऽऽऽन | ||||||||||
चिरंजीव भव ...सुपरमँऽऽऽऽऽन | ||||||||||
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान | ||||||||||
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान | ||||||||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे..........सुपरमँन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment