मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, | ||||
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो. | ||||
मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, | ||||
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी, | ||||
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, | ||||
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो. | ||||
डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, | ||||
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप, | ||||
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते, | ||||
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो. | ||||
मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो, | ||||
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो, | ||||
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, | ||||
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो. | ||||
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, | ||||
नवसांची ठेवून लाच लावतो बोली, | ||||
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या | ||||
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो. | ||||
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, | ||||
लपतो न परि चेहरा आत भेसूर, | ||||
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, | ||||
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो | ||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे...........मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो.......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment