अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा | ||||
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥ | ||||
आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर | ||||
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर | ||||
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर | ||||
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥ | ||||
कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी | ||||
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी | ||||
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी | ||||
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥ | ||||
कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी | ||||
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी | ||||
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी | ||||
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥ | ||||
कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते | ||||
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते | ||||
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते | ||||
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥ | ||||
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा | ||||
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ... | ||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे.............अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment