मी मोर्चा नेला नाही | |||||
मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही | |||||
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही | |||||
भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना | |||||
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना | |||||
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा | |||||
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही | |||||
नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे | |||||
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने | |||||
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही | |||||
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही | |||||
धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी | |||||
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी | |||||
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो | |||||
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही | |||||
मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो | |||||
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो | |||||
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही | |||||
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही | |||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे..........मी मोर्चा नेला नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment