Tuesday, January 18, 2011

मी फुल तृणातील इवले ......... मंगेश पाडगावकर

जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:ला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणाच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

- मंगेश पाडगावकर

15 comments:

  1. ह्या ब्लोग वरच्या बऱ्याचश्या कविता विषयीचं माझं प्रेम मराठी medium मध्ये शिकलेल्यानाच कळू शकता... शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या.... thank u guys for posting it.

    ReplyDelete
  2. very nice, where can i get poem "Mala vatate basuni vimaani..affat gagani hindave..kinva sundar nauke madhuni samudradun hindave.."

    ReplyDelete
    Replies
    1. Saturday, March 17, 2012
      मला वाटते.....Remembered poem of 2nd standard
      मला वाटते बसुनी विमानी
      अफाट गगनी हिंडावे,
      किंवा सुंदर नौके मधुनी
      समुद्रातुनी भटकावे.

      निळा निळा तो समोर डोंगर,
      चढुनी त्यावर पाहावे,
      राज्य पऱ्यांचे जाऊनी तेथे,
      राज्य पदाते मिळवावे.

      परी भूमीवर संध्याकाळी,
      छाया काळी जो धावे,
      तेव्हा वाटे सोडूनी सकला
      नीज मातेला बिलगावे.

      Delete
  3. One of my favourite poem. Thanks for post it.

    ReplyDelete
  4. My most favourite poem. Thanks for posting it����

    ReplyDelete
  5. माझी सर्वात आवडती कविता

    ReplyDelete
  6. माझी सर्वात आवडती कविता! खूप छान

    ReplyDelete
  7. 2006 madhe Syllabus. Mazi fevret kavita
    ......... mangesh padgonkar

    ReplyDelete