दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥
गीतकार : बा. भ. बोरकर
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
गाळुनिया भाळीचे मोतीयज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥
जिथे विपत्ती जाळी उजळीमध्यरात्रि नभघुमटाखाली
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥
गीतकार : बा. भ. बोरकर
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
No comments:
Post a Comment