Wednesday, January 12, 2011

रचना ..... विंदा करंदीकर

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

2 comments:

  1. धन्यवाद योगिता आपल्या ब्लॉगवरून कवितांच विश्व अनुभवायला मिळालं. अप्रतिम व सर्व दर्जेदार कवितांचे संकलन वाचायला मिळालं सर्व कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहेत पुन्हा वाचताना असं वाटले की एक विद्यार्थी म्हणून आपण वर्गाचा अभ्यास करत आहोत. सर्व कविता वाचताना वेळ कसा गेला काही कळलंच नाही.

    ReplyDelete
  2. धन्यवाद योगिता,मनीष आणि सहकारी मित्रहो
    आपल्या ब्लॉगवरून कवितांच विश्व अनुभवायला मिळालं. अप्रतिम व सर्व दर्जेदार कवितांचे संकलन वाचायला मिळालं सर्व कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहेत पुन्हा वाचताना असं वाटले की एक विद्यार्थी म्हणून आपण वर्गाचा अभ्यास करत आहोत. सर्व कविता वाचताना वेळ कसा गेला काही कळलंच नाही.

    ReplyDelete