गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
- बा.भ. बोरकर
रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलीलदिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरीधुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकितमीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
- बा.भ. बोरकर
खूपच छान हा ब्लॉग आहे. आठवणीतली सुंदर आणि आता दुर्मिळ गाणी कविता आणि बरेच काही मिळाले.खूप धन्यवाद.
ReplyDelete