भय इथले संपत नही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया
तो बोल मंद हलकासा
आयुष्य स्पर्शुनि गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला
स्तोत्रांत इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही.
ही कविता नारायण सुर्वे यांची नसून कवी ग्रेस यांच्या "चंद्रमाधवीचे प्रदेश" या संग्रहातील आहे...
ReplyDeleteमूळ कविता मोठी असून त्यात मंगेशकरांनी चाल न लावलेल्या अशा काही कडव्यांचाही समावेश आहे.
कृपया ही चूक सुधारावी.
ही कविता नारायण सुर्वे यांची नसून कवी ग्रेस यांची आहे. कृपया ही चूक सुधारावी.
ReplyDelete