Wednesday, January 12, 2011

सारे तिचेच होते.....विंदा करंदीकर

ऐन तारुण्यात आपल्या एका रसिक मित्राच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता पहा .सारे तिचेच होते,सारे तिच्याचसाठी;

हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो-- खोटे कशास बोला--
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी !

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली का ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी !

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !

“साठीचा गजल” कविवर्य विंदा करंदीकर

8 comments:

  1. I love this poem. It was a pleasure to listen it from Vindaji long time ago

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. माझी आवडती कविता..

    ReplyDelete
  4. माझी एक आवडती कविता..

    ReplyDelete
  5. खूप आनंददायी कविता आहे

    ReplyDelete
  6. खूप आनंदाची कविता आहे

    ReplyDelete
  7. कितीही वेळा वाचली तरी नवीन होऊन रूजणारी

    ReplyDelete