Wednesday, January 5, 2011

देवा तुझे किती सुंदर आकाश .....ग. ह. पाटील

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश, सूर्य देतो

सुंदर चांदणे, चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाती गाणे

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर, असशील

1 comment:

  1. मस्त मस्त लहान मुलासारखे बागडावे असे वाटले हि कविता वाचून!!!!

    ReplyDelete