भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य
जन्माला आलेला नाही! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या
साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला
भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद
स्वप्न पहाणं, ते फुलविणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी
भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी
दुस-या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! माणसाने
ओठांशी नेलेला प्याला अनेकदा नियतीला पाहवत नाही.
एखाद्या चेटकिणीसारखी ती अचानक प्रकट होते आणि
क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.
No comments:
Post a Comment